
गंगाईकोंडा चोलपुरम (तमिळनाडू) : ‘‘देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला झाला, तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देतो, हे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने पाहिले आहे. या सीमापार लष्करी आक्रमणामुळे देशाचाही आत्मविश्वास वाढला आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. तसेच, हल्ला करणारे दहशतवादी आणि भारताचे शत्रू यांच्यासाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही, हेच या कारवाईतून सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.