esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बापूंना नमन
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बापूंना नमन

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बापूंना नमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 152 वी जयंती आहे. २ ऑक्टोंबर १८६९ मध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला होता. महात्मा गांधी यांना आज देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना नमन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांनी राजघाटावर गांधी पुतळ्यासमोर श्रद्धांजली अर्पण केली. नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून श्रद्धांजली अर्पण केली. कोरोनामुळे लोक घरातच असल्याने प्रत्येकाने घरातच राहून महात्मा गांधी यांना उत्साहपणे श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बापूंचं जीवन प्रत्येक पिढी प्रेरणादायी असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी केलं. त्यानंतर राजघाटावर जात महात्मा गांधी यांना अभिवादनही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय राष्ट्रपती रामनाथ कोविंद, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

महात्मा गांधी यांचे विचार व वैश्विक मूल्ये आजही तितकीच प्रेरणादायी - शरद पवार

भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांचीही आज जयंती आहे. विजय घाटावर जाऊव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरंजली वाहिली. सोनिया गांधी यांनीही शास्त्री यांना अभिवादन केले.

loading image
go to top