esakal | पंतप्रधान मोदी, राहुल गांधींकडून इंदिराजींना आदरांजली
sakal

बोलून बातमी शोधा

ManmohanSingh

दिल्लीतील त्यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळ येथे आज सकाळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांना जाऊन आदरांजली वाहिली. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींकडून इंदिराजींना आदरांजली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आयर्नलेडी अशी ओळख असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज (ता. 19) 102 वी जयंती असून, देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दिल्लीतील त्यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळ येथे आज सकाळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांना जाऊन आदरांजली वाहिली. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरा गांधी यांचा जन्म 1917 मध्ये अलाहाबाद येथे झाला होता. त्या 1966 ते 1977 आणि 1980 ते 1984 या काळात भारताच्या पंतप्रधान होत्या. 

जिंदगी मे कुछ पाना हो तो... : संजय राऊत

मोदींनी ट्विट करताना म्हटले आहे, की आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो. तर, राहुल गांधी यांनी म्हटले आहे, की सशक्त, समर्थ नेतृत्व आणि अद्भुत क्षमता असलेली भारताला एक कणखर देश म्हणून समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी आयर्नलेडी माझी दादी इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा...

शरद पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील : संजय राऊत

loading image