esakal | कोरोना व्हायरसवर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; केंद्रीयमंत्री म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना व्हायरसवर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; केंद्रीयमंत्री म्हणाले...

मृतांच्या संख्येत वाढ

- कोव्हिड-19 नाव

कोरोना व्हायरसवर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; केंद्रीयमंत्री म्हणाले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर केंद्र सरकार गंभीर नाही, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सरकारची बाजू मांडली. कोरोना व्हायरसमुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लक्ष ठेवून आहेत, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी व्यक्तिश: कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि ते याबाबत विविध विभागांशी संपर्कात आहेत. तसेच चीन, थायलंड, हाँगकाँग, सिंगापूर, जपान आणि साऊथ कोरिया या देशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांची आरोग्य तपासणी विमानतळावरच व्हावी, यासाठी आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. 

मृतांच्या संख्येत वाढ

कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या संसर्गामुळे आत्तापर्यंत 1369 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44,653 पेक्षा अधिक झाली आहे. 

CoronaVirus : स्त्री की पुरुष कोणाला आहे कोराना व्हायरसचा अधिक धोका?

कोव्हिड-19 नाव

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गाला कोव्हीड-१९ (सीओव्हीआयडी) असे नाव दिले आहे

loading image