CoronaVirus : स्त्री की पुरुष कोणाला आहे कोराना व्हायरसचा अधिक धोका?

वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका स्त्रीयांना आहे की पुरुषांना याचे उत्तर संशोधकांनी शोधून काढले आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाव्हायरसचं प्रमाण जास्त असल्याचं संशोधकांच्या अभ्यासात दिसून आले आहे.

पुणे : कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका स्त्रीयांना आहे की पुरुषांना याचे उत्तर संशोधकांनी शोधून काढले आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाव्हायरसचं प्रमाण जास्त असल्याचं संशोधकांच्या अभ्यासात दिसून आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला असू शकतो, हा अभ्यास संशोधकांनी या ठिकाणी केला. नुकत्याच झालेल्या 2 संशोधनातून असे समोर आले आहे की कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका पुरुषांना आहे.

ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये पाहा चक्क काय केले जातेय

चीनच्या वुहान विद्यापीठाच्या रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांचं परीक्षण केले. या अभ्यासात 52 टक्के पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा तपासण्यात आला त्यावेळी एकूण रुग्णांपैकी 68 टक्के पुरुष रुग्ण होते, यावरून तज्ञांनी पुरुषांना जास्त बाधा होत असल्याचा निकष बांधला आहे. पुरुषांपेक्षा महिलांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

न्यायालयाच्या आवारातच बाँबस्फोट; तीन जखमी

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे थैमान सुरूच असून, बुधवारी चोवीस तासांत सुमारे २५४ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे चीनमधील मृतांची संख्या १३०० वर पोचली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेई प्रांतात काल एकाच दिवशी २४२ जणांचा मृत्यू झाला. तसेच, १५ हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. स्थानिक आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार, हुबेई प्रांतात कोरोनाचे १४,८४० नवीन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आत्तापर्यंत ४८ हजार २०६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्याचा वेगाने होणारा प्रसार पाहता ती संख्या ६० हजारपर्यंत पोचू शकते, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Image result for corona virus esakal

केजरीवालांच्या शपथविधीचे कोणा-कोणाला निमंत्रण

चीनमध्ये बुधवारपर्यंत कोरोना संसर्गामुळे एकूण मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १११५ वर पोचली होती. जागतिक आरोग्य संघटनेची विशेष टीम दोन दिवसांपूर्वी चीनमध्ये पोचली आहे. त्याचे नेतृत्व ब्रुस एलवर्ड करीत आहेत. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत काम सुरू केले आहे. चीनबाहेर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, ती ४४० वर पोचली आहे. त्यात एकाचा फिलिपिन्स येथे मृत्यू झाला आहे. याशिवाय जपानमध्ये सर्वाधिक रुग्ण दोनशेहून अधिक आढळून आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men represent the majority of coronavirus cases so far according to a new study