PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

PM Modi Holds Telephonic Talks with Vladimir Putin: भारत आणि अमेरिकेत ट्रेड वॉर सुरू आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे, यामुळे भारताने यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.
Prime Minister Narendra Modi speaks with Russian President Vladimir Putin to discuss strategic cooperation and key international issues.
Prime Minister Narendra Modi speaks with Russian President Vladimir Putin to discuss strategic cooperation and key international issues. esakal
Updated on

PM Modi and Vladimir Putin discuss key issues in bilateral talks: एकीकडे भारत आणि अमेरिकेत ट्रेड वॉर सुरू आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे, यामुळे भारताने यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तर भारताव्यतिरिक्त रशिया आणि चीन या सारख्या बलाढ्य राष्ट्रांनीही अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे.

यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पतीन हे भारतात येणार आहेत. तर पंतप्रधान मोदी हे चीनला जाणार आहेत. यामुळे अमेरिकेचा अधिकच तीळपापड होणार हे निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदींनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे आणि त्यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

याशिवाय राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींसोबत युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली आणि द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावाही घेतला. पीआयबीच्या अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित नवीनतम घडामोडींबद्दल माहिती दिली. त्यानंतर, पंतप्रधान मोदींनी पुतीन यांचे सविस्तर मूल्यांकन केल्याबद्दल आभार मानले आणि रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणाच्या बाजूने भारताची कायमची भूमिका पुन्हा मांडली.

Prime Minister Narendra Modi speaks with Russian President Vladimir Putin to discuss strategic cooperation and key international issues.
Rakhi Price Hike Viral Video : राखी खरेदीआधी एकदा हा व्हिडिओ नक्की बघा; काही सेकंदातच दोन रुपयांची राखी झाली ५० रुपयांना!

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या भारत-रशिया वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीनंतर, व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यास नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com