
हैदराबाद : तेलुगू संत रामानुजाचार्य (Sant Ramanujacharya) यांच्या २१६ फूट उंचीच्या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडलं. या पुतळ्याला 'स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी' (Statue of Equality) नावानं संबोधण्यात येत आहे. मोदींनी यावेळी जगभरातील रामानुजाचार्यांच्या अनुयायांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी तेलगू प्रचीन संस्कृतीचं तसेच आलिकडच्या काळात प्रसिद्ध पावलेल्या तेलुगू सिनेसृष्टीचंही कौतुक केलं. (PM Modi praises Telugu culture and Cinema at event of inauguration of Statue of Equality)
मोदी म्हणाले, तुलगू संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेला तेलुगू चित्रपटसृष्टी देखील जगात पुढे नेत आहे. तेलुगू सिनेमाचा परीघ केवळ तितकाच नाही जिथं फक्त तेलुगू भाषा बोलली जाते. याचा विस्तार संपूर्ण विश्वात झाला आहे. सिल्वर स्क्रीन पासून ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत या क्रिएटिव्हीटीची चर्चा सुरु आहे. भारताबाहेरही याची खूपच प्रशंसा होत आहे. तेलुगू भाषिकांचं आपली कला आणि संस्कृतीप्रती हे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मोदी म्हणाले, "विकासासाठी तुम्ही आपली मूळं सोडणं महत्वाचं नाही. रामानुजाचार्यांनी दलित समाजासाठी काम केलं. रामानुजाचार्यांचा पुतळा अर्थात 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' तरुणांना प्रेरित करेल. रामानुजाचार्यांचा हा पुतळा ज्ञानाचे, अलिप्ततेचं आणि आदर्शांचे प्रतिक आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षी या अमृत कालमध्ये रामानुजाचार्यांचा पुतळा प्रत्येक देशवासियांना कायम प्रेरणा देत राहिल. मला पूर्ण विश्वास आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण त्या कुप्रथांना पूर्णपणे संपवू ज्यांना नष्ट करण्यासाठी रामानुजाचार्यांनी समाजाला जागृत करण्याचं काम केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.