कोरोना लढा ते शेतकरी आंदोलन; थोडक्यात संसदेत काय म्हणाले मोदी?

modi in parliament
modi in parliament

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांनी संसदेत केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे...


राष्ट्रपतींचे आणि सदस्यांचे मानले आभार
या नव्या दशकासाठी मार्ग प्रशस्त करणारे राष्ट्रपतीचं उद्बोधन होतं
मी राष्ट्पतींचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभा आहे. राज्यसभेम्ये जवळपास 13-14 तासांहून अधिक अनेक सदस्यांनी आपले बहुमल्य विचार मांडले आहेत. मी सगळ्याच सदस्यांचे मनपूर्व आभार मानतो. मात्र राष्ट्रपतींचे भाषण ऐकण्यासाठी सगळेच उपस्थित असते तर लोकशाहीचा मान अधिक वाढला असता. मात्र, त्यांच्या भाषणाची ताकदच एवढी होती की न ऐकून देखीलही त्याचं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहोचल.

कोरोनानंतर जग भारताकडे आशेने पाहतंय
आज जागची नजर भारताकडे आहे , अपेक्षा आहेत. भारताकडूनच जगातील अनेक समस्यांची उत्तर मिळवण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या दरम्यान ज्याप्रकारची जागतिक परिस्थिती होती, कोणी कुणाची मदत करणं देखील असंभव झाले. भारताबद्दल जग चिंतित होतं. कोरोनाच्या संकटात जर भारत स्वत:ला सांभाळू शकला नाही तर काय होईल, या विचाराने जग चिंतेत होतं. मात्र, भारताने नव्या विचाराने नव्या पद्धतीने अज्ञात शत्रूशी लढा दिला. ही लढाई जिंकण्याचं यश कुणाही सरकारला अथवा व्यकीतला जात नाही. मात्र भारताला तर जातं.

दिवे लावणे, थाळी वाजवणे उपक्रमाची थट्टा उडवणाऱ्यांवर टीका
ज्याने कधी शाळेच तोडं बघितलं नव्हत त्याने दखील दिवा लावला आणि देशात सामुहिक शक्तीचं दर्शन घडवलं. त्याचा देखील थट्टा उडवली गेली. विरोध करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत मात्र ज्या गोष्टींनी देशाचं मनोबल आणि सामर्थ वाढवलं जातं, अशा बाबींवर टीका करणे बरोबर नाही. भूतकाळात पोलिओ किती धोकादायक वाटत होता. इतक्या कमी काळात देशातील वैज्ञानिकांनी लस तयार केली. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम आपल्या देशात सुरु आहे. सुरवातीला कुठले औषध काम करेल हे माहित नव्हतं, तेंव्हा भारताकडे जगाचं लक्ष गेलं. आपण 150 देशांना औषध पोहोचवण्याचं काम केलं. आज जग मोठ्या गर्वाने म्हणतंय की आमच्याकडे भारताची लस आली आहे. भारताने आपल्या फेडरल स्ट्रक्चरने संकटाच्या समयी एकत्र येऊन कसं काम केलं जाऊ शकतं, याचं दर्शन घडवलं. 


सदनात लोकशाहीवर उपदेश दिले गेले
सदनात चर्चेवेळी लोकशाहीवरुन अनेक उपदेश दिले गेले. मात्र, देशाचा कुणीही नागरिक याकडे लक्ष देणार नाही. भारताची लोकशाही इतकी तकलादू नाहीये की जे असा टीकांनी कमकुवत होईल.. मी डेरक ओब्रायन यांचं भाषण ऐकतानाचे शब्द ऐकून मला वाटलं की हे बंगालमधील परिस्थितीबाबत बोलताहेत की देशाच्या?
भारतातल्या लोकशाहीवर जे लोक शंका घेत आहेत ते भारताच्या शक्तीवरच शंका घेत आहेत. त्यांना मी सांगेन की आपली लोकशाही कोणत्याही बाबतीत वेस्टर्न इन्स्टिट्यूशन नाहीये तर ती एक ह्युमन इन्स्टिट्यूशन आहे. भारत लोकशाहीच्या अशा उदाहरणांनी समृद्ध आहे. भारताच्या राष्ट्रवादावर चारीबाजूने होणाऱ्या हल्ल्याबाबत दक्ष करणं आवश्यक  आहे. भारताचा राष्ट्रवाद स्वार्थी आणि आक्रमक नाहीये तर तो सत्यम, शिवम, सुंदरम् या मुल्यांनी प्रेरित आहे. भारत हा लोकशाहीची जननी आहे. आपण फक्त मोठी लोकशाही नव्हे तर लोकशाहीची जननी आहोत. भारताची संस्कृती, संस्कार लोकशाही आहे. आपण मुळातच लोकशाहीवादी आहोत. आणीबाणीचे दिवस आठवा, न्यायपालिका, मीडिया आणि शासनाची अवस्था आठवा, मात्र या देशाचे संस्कार, तनमन या लोकशाहीला कुणीही हलवू शकलं नाही. ही आपल्या संस्काराची ताकद आहे. आणि आपल्याला या लोकशाही मुल्यांचे संरक्षण करतच पुढे प्रगती करायची आहे.

भारतात गुतंवणूकीसाठी जग उत्सुक
कोरोना काळात जगातील देश गुंतवणुकीसाठी तडफडत आहेत मात्र भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. जगात इतर देशांमध्ये एकाबाजूला निराशा आहे तर भारतात आशेचा किरण दिसतोय. सध्या भारतात अन्न उत्पादन रेकॉर्ड स्तरावर आहे. इंटरेनट युझर्समध्ये आणि मोबाईल निर्मितीमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आज महिन्याला चार लाख कोटींचे व्यवहार डिजीटली होतात. याच डिजीटल मोहिमेवर याआधी शंका घेतली जात होती. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकची आपली क्षमता जगाने पाहिलीय. सरकारने 10 कोटी हून अधिक शौचलाय, 2 कोटी गरिबांना घरे, 8 कोटी मोफत गॅस, 5 कोटी हून अधिकांना मोफत उपचार अशा अनेक याोजनांनी गरिबांना दिलासा दिला आहे. 

कृषी कायद्यांवर काय म्हणाले मोदी?

कृषी कायद्यांवर आम्ही चर्चेला तयार आहोत. मी सभागृहातून आवाहन करतो की, शेतकऱ्यांनी चर्चेला यावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'ग्रामीण अर्थव्यवस्थेचं एक मोल आहे. अर्थव्यवस्थेचा हा महत्त्वाचा कणा आहे. गेल्या दोन दशकांपासून कृषी क्षेत्रातील सुधारणांवर चर्चा सुरू आहे. पण, ही केवळ चर्चा आहे. आम्ही पावले उचलली. डॉ. मनमोहन सिंग सभागृहात उपस्थित आहेत. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यावर त्यांनीही मत व्यक्त केलं होतं. आम्ही तेच काम करत आहोत. एखाद्या कुटुंबातही एकमेकांवर नाराजी असते. पण, सध्या कृषी कायद्यांवर चर्चा होत नाही. केवळ विरोध होत आहे.' भाषणात पंतप्रधान मोदींनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, 'शरद पवार आणि काँग्रेसच्या लोकांनी कृषी सुधारणेची वकिली केली आहे. त्यांनाही सुधारणा हवी आहे. प्रत्येकाला वाटतं की हे व्हायला हवं. मी सुधारणेच्या बाजूने आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. पण, देशात सध्या आंदोलनावच्या फायद्यासाठी राजकारण प्रभावी होत आहे. हे दुर्दैवी आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com