esakal | नितीशबाबूंच्या सुशासनाचे मोदींकडून कौतुक 
sakal

बोलून बातमी शोधा

nitishkumar

नवी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा आणि पॉलिटेक्निक महाविद्यालये याच काळामध्ये उभी राहिली. यामध्ये नितीशकुमार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे मोदी यांनी नमूद केले. 

नितीशबाबूंच्या सुशासनाचे मोदींकडून कौतुक 

sakal_logo
By
पीटीआय

पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोचला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पाठ थोपटताना त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासकामे याच जोमाने सुरू राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पेट्रोलियम क्षेत्रातील नऊशे कोटी रुपयांच्या तीन बड्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय जनता दल आणि लालूप्रसाद यादव यांचा थेट नामोल्लेख टाळत मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. तुमचा दृष्टिकोन मागासलेला असेल तर आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. असा विचार करणारी मंडळी ही जेव्हा गरिबांच्या कल्याणाचा विषय समोर येतो तेव्हा केवळ बोलण्याशिवाय काहीही करू शकत नाही. बिहारने या आधी बराच काळ अशी मानसिकता सहन केली आहे. अनेकदा हे सांगून रस्ते प्रकल्पांना विरोध करण्यात आला की लोकांकडे वाहन नसल्यामुळे ते केवळ पायीच चालण्याला पसंती देतात. यामुळे उच्च शिक्षण क्षेत्राचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील पंधरा वर्षांच्या सुशासनाच्या काळामध्ये हे चित्र बदलले असून पायाभूत सेवांमध्ये आमूलाग्र सुधारणा झाल्या आहेत. नवी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा आणि पॉलिटेक्निक महाविद्यालये याच काळामध्ये उभी राहिली. यामध्ये नितीशकुमार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे मोदी यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हीच मोठी संधी - मोदी 
लॉकडाउनमुळे अनेक कामगारांनी परतीचा मार्ग धरला, आज ते त्यांच्या घरी परतले आहेत. या संकटाने आपल्याला एक संधी देखील दिली आहे. आर्थिक व्यवहारांना गती देऊन आपण नवा रोजगार देखील निर्माण करू शकतो, असे मोदी यांनी स्पष्ट केले. मोदींच्या हस्ते पश्चिम बंगालमधील दुर्गापूर ते बिहारमधील बांकादरम्यान उभारल्या जाणाऱ्या १९३ किलोमीटर लांबीच्या एलपीजी पाईपलाईनचे उद् घाटन करण्यात आले. बांका आणि पूर्व चंपारण्यमध्ये हरसिद्धी येथे उभारण्यात येणाऱ्या एलपीजी बॉटलिंग प्रकल्पांचेही मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा