PM Narendra Modi: पाकिस्तानला चांगलंच माहिती आहे की, हा देश भारताविरोधात थेटपणे लढाई जिंकू शकत नाही. त्यामुळं दहशतवाद्यांना भारतात पाठवलं जातं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. गुजरात दौऱ्यावरील आज दुसऱ्या दिवशी गांधी नगरच्या महात्मा मंदिरात ५,५३६ कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर आणि दहशतवाद्यांवर जोरदार हल्लाबोल केला.