
सरदार पटेल यांचा पुतळा भारत-कॅनडा संबंधांचे प्रतीक : PM मोदी
कॅनडातील सनातन मंदिर सांस्कृतिक केंद्रातील सरदार पटेल यांचा पुतळा केवळ सांस्कृतिक मूल्यांनाच बळकट करणार नाही तर भारत-कॅनडा संबंधांचेही प्रतीक बनेल. कारण हा पुतळा भारतासाठी प्रेरणादायी असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले.
हेही वाचा: PM मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; घेणार द्विपक्षीय, बहुपक्षीय बैठका
सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून भारताला हजारो वर्षांच्या वारशाची आठवण करून दिली. त्यांचा पुतळा, त्यांचे कार्य भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे कॅनडातील सरदार वल्लभभाईंचा पुतळा दोन्ही देशांमधील नातेसंबंध अधिक चांगले करणार आहे. तसेच हा पुतळा दोन्ही देशातील संबंधांचे प्रतीक आहे, असं मोदी म्हणाले.
एखादा भारतीय पिढ्यानपिढ्या जगात कुठेही राहतो. पण त्याचं भारतीयत्व आणि भारताप्रती प्रेम जराही कमी होत नाही. तो कोणत्याही देशात राहत असेल तरी आपल्या देशाची प्रामाणिकपणे सेवा करतो. भारतातील त्यांच्या पूर्वजांनी पार पाडलेली लोकशाही मूल्ये आणि कर्तव्याची भावना त्यांच्या हृदयात असते, असंही ते म्हणाले.
भारत देश महान असून पंरपरा, संस्कृती, विचारधारा सर्व दृष्टीने आपला देश समृद्ध आहे. आपण इतरांचे नुकसान करून स्वतःचा विकास व्हावा, असा विचार कधीच करत नाही. आपण इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. शाश्वत विकास आणि हवामान बदलासारख्या मुद्द्यांवर भारताने आवाज उठवला. त्यामधून मानवतेचं दर्शन होतं. भारत घेत असलेली मेहनत फक्त आमच्यासाठी नाहीतर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, असंही मोदी म्हणाले.
Web Title: Pm Modi Says Sardar Patel Statue Symbol Of India Canada Relation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..