
PM मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; घेणार द्विपक्षीय, बहुपक्षीय बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन मेपासून तीन देशांना भेट देणार आहेत. यावेळी ते २५ कार्यक्रमांना हजेरी लावतील. तीन दिवसांच्या भेटीदरम्यान ते सुमारे ६५ तास घालवतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी शनिवारी दिली. नरेंद्र मोदी सात देशांतील आठ नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (PM Narendra Modi on a three nation tour)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ५० जागतिक उद्योगपतींशीही संवाद साधणार आहेत. मोदी २ मे रोजी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यावर्षी होणारा त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. पंतप्रधान ४ मे रोजी परतण्यापूर्वी प्रथम जर्मनी (Germany), नंतर डेन्मार्क (Denmark) आणि नंतर काही काळ पॅरिसमध्ये (Paris) राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा: खासदार कृपाल तुमानेंचा नवनीत राणांवर हल्ला; मंत्री व्हायचे म्हणून...
सूत्रांनी सांगितले की, नरेंद्र मोदी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये प्रत्येकी एक रात्र घालवतील. युक्रेनचे संकट सुरू असताना आणि रशियाच्या कारवायांमुळे जवळजवळ युरोप एकवटला आहे अशावेळी त्यांची भेट होईल. पीएम मोदींचा हा दौरा आणि सभा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
भारत मजबूत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. देशातील सेमीकंडक्टरचा वापर २०३० पर्यंत USD ११० अब्ज ओलांडण्याची अपेक्षा आहे. ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी स्टार्ट-अप ‘इको-सिस्टम’ आहे. भारत पुढील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्यास तयार आहे. इतर गोष्टींसह 5G मध्ये क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक करीत आहे, असे नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) शुक्रवारी सांगितले होते.
Web Title: Pm Narendra Modi On A Three Nation Tour Bilateral Multilateral Meetings To Be Held From May 2
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..