esakal | अलीगढशी जुनं नातं; मोदींनी सांगितली वडिलांच्या मुस्लिम मित्राची आठवण
sakal

बोलून बातमी शोधा

अलीगढशी जुनं नातं; मोदींनी सांगितली वडिलांच्या मुस्लिम मित्राची आठवण

अलीगढबाबत असलेल्या जुन्या आठवणी सांगताना पंतप्रधान मोदींनी एका मुस्लिम व्यक्तीशी त्यांच्या वडिलांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

अलीगढशी जुनं नातं; मोदींनी सांगितली वडिलांच्या मुस्लिम मित्राची आठवण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अलीगढ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात अलीगढमध्ये मंगळवारी राजा महेंद्र प्रताप सिंह विश्वविद्यालय आणि डिफेन्स कॉरिडॉरच्या बांधकामाचा शुभारंभ केला. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याचा फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे. अलीगढमध्ये आय़ोजित कार्यक्रमावेळी बोलताना मोदींनी त्यांच्या लहानपणीची एक आठवण सांगितली. अलीगढबाबत असलेल्या जुन्या आठवणी सांगताना पंतप्रधान मोदींनी एका मुस्लिम व्यक्तीशी त्यांच्या वडिलांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

मोदी म्हणाले की, एक मुस्लिम व्यक्ती होती. जे दरवर्षी तीन महिन्यांसाठी आपल्या गावी येत होते. कुलुपांची विक्री करायला ते आमच्याकडे यायचे. तेव्हा माझ्या वडिलांसोबत त्यांची चांगली मैत्री होती. दिवसभरात जी काही कमाई व्हायची ती वडिलांकडे द्यायचे. ज्यावेळी ते पुन्हा त्यांच्या गावी अलीगढला परत जण्यासाठी निघायचे तेव्हा वडिलांकडून पैसे घ्यायचे. लहानपणापासून उत्तर प्रदेशातील दोन शहरांची ओळख आहे. डोळ्याला काही इजा झाली, आजार असेल तर सीतापूरला जायची चर्चा व्हायची. याशिवाय मुस्लिम व्यक्तीमुळे अलीगढचं नाव ऐकायला मिळायचं. आता कुलपांशिवाय शस्त्रांसाठीही या शहराला आपण ओळखू, कुलपांमुळे घराचं संरक्षण होत होतं तर शस्त्रांनी देशाच्या सीमेचं संरक्षण होईल असेही मोदींनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा: निवडणुकीआधी PM मोदींचं उत्तर प्रदेशला गिफ्ट

पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कल्याण सिंह यांचीही आठवण यावेळी काढली. त्यांनी म्हटलं की, आज कल्याण सिंह इथं नसल्याची उणीव जाणवत आहे. ते आपल्यासोबत असते तर राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठ आणि अलीगढची संरक्षण क्षेत्रात तयार होत असलेली ओळख पाहून त्यांना आनंद झाला असता. ते जिथेही असतील तिथून आपल्याला आशीर्वाद देत असतील.

विद्यापीठाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, हे स्वप्न साकार करण्यासाठी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. हे विद्यापीठ आधुनिक शिक्षणाचे केंद्र तर होईलच. याशिवाय देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित शिक्षण आणि तंत्रज्ञान तयार करण्यासाठीचं मनुष्यबळ इथूनच बाहेर पडेल असंही मोदींनी म्हटलं.

loading image
go to top