
PM Modi attacks Congress, declares “No shelter for terrorists and infiltrators in India.
sakal
मंगालदोई (आसाम) : ‘‘भारतीय लष्कराच्या जवानांना पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेसने पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा दिला,’’ असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. तसेच, घुसखोरी ही अत्यंत गंभीर समस्या बनली असून देशात घुसखोरांना अजिबात थारा देणार नाही, असेही मोदींनी स्पष्ट केले.