
नवी दिल्ली : ‘‘आणीबाणी लादण्याचा अध्याय हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळ्या अध्यायांपैकी एक होता. या अध्यायाला ५० वर्षे पूर्ण झाली असून, राज्यघटनेच्या मूळ भावनेला त्यावेळी काँग्रेसने चिरडले होते,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी समाज माध्यमातून केली.