PM Narendra Modi: 'कितीही खाऊ घातले तरी तुमचे पोट भरत नाही...'; पंतप्रधान मोदींनी उद्योगपतींना फटकारले

PM Modi Slams Corporates FICCI Event: गेल्या एका दशकात भारतातील वास्तविक वेतनवाढ एकतर स्थिर राहिली आहे किंवा घटली आहे, तसेच खाजगी क्षेत्र दर्जेदार नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे.
PM Narendra Modi

PM Narendra Modi

esakal

Updated on: 

नवी दिल्लीः भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रावर तीव्र शब्दांत टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उद्योगपतींना सुनावले. उद्योगजगताने सरकारच्या कर सवलतींचा सर्व फायदा स्वतःच्या खिशात घातला, परंतु नवीन नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत किंवा कर्मचाऱ्यांचे पगारही वाढवले नाहीत, अशा शब्दांत मोदींनी फटकारले.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. अनेक बडे उद्योगपती समोर बसलेले असताना पंतप्रधानांनी पहिल्यांदाच व्यवसायिक नेत्यांना इतक्या कठोर शब्दांत खडेबोल सुनावले.

Loading content, please wait...