भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार - पंतप्रधान मोदी 

टीम ई सकाळ
Monday, 11 January 2021

कोरोना लशीबाबत भारत आत्मनिर्भर असून सर्वात आधी करोना योद्ध्यांना लस देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितलं.

नवी दिल्ली - देशात कोरोना लसीच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याआधी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रन पार पडली. यानंतर आता लसीकरणाला सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

मोदी काय म्हणाले

 • कोरोनाची ही लढाई आता निर्णायक टप्प्यात आली आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 
 • देशातील प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन पार पडल्या. ही आपल्या देशाची क्षमता दाखवते.
 • कोरोना लशीबाबत भारत आत्मनिर्भर असून सर्वात आधी करोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे.
 • आधारच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ओळख पटवण्यात येईल. 
 • कोविनवर लशीकरणाचा डेटा अपलोड होईल याची काळजी घ्यावी.
 • डेटा अपडेट करणं बंधनकारक असणार आहे. यात थोडसं दुर्लक्ष मोठं नुकसान होईल.
 • जगभरात अडीच कोटी लोकांना लशीकरण कऱण्यात आलं आहे.
 • भारतात पुढच्या काही महिन्यात तीस कोटी लोकांना लसीकरण करायचं आहे. जगातील इतर लसीकरण मोहिमांच्या तुलनेत हे खूप आव्हानात्मक असणार आहे.
 • व्हॅक्सिनमुळे कोणाला त्रास झाला तर त्यासाठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे
 • कोरोनाच्या लशीकरणासाठी या व्यवस्थेत काही त्रुटी राहणार नाहीत यासाठी जबाबदारीने लक्ष दिलं जाईल
 • महत्त्वाचं म्हणजे ज्यांना लस दिली जात आहे त्यांनीही कोरोनाच्या गाइडलाइन्स पाळायलाच हव्यात.
 • प्रत्येक राज्य, केंद्र शासित प्रदेशाने अफवा पसरू नयेत याकडे लक्ष दिलं पाहिजे.
 • भारतासह जगातील समाजकंटक लशीकरणाच्या मोहिमेत अडथळा यावा म्हणून प्रयत्न करतील. असे काही प्रयत्न झालेच तर ते हाणून पाडायचे आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi Speaking interaction with CMs on vaccination rollout