
PM Modi : 'जेवढा चिखल टाकाल, तेवढं कमळ फुलेल', विरोधकांवर PM मोदींचा हल्लाबोल
PM Modi Speech in Rajya Sabha : लोकसभेतील कालच्या भाषणानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
मोदी म्हणाले की, 'तुम्ही जेवढा चिखल फेकाल, तेवढे कमळ फुलेल' राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी बोलत होते.
सभागृहातील काही लोकांचे वर्तन आणि भाषण केवळ सभागृहाचीच नव्हे तर देशाचीही निराशा करणारे असून, हे दुर्दैवी आहे. ‘कीचड़ उसके पास था मेरे पास गुलाब… जो भी जिसके पास था उसने दिया उछाल’. जितना कीचड़ उछालोगे कमल उतना ज़्यादा खिलेगा.” असे उत्तर मोदींनी विरोधकांना दिले.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, '60 वर्षांपासून काँग्रेस परिवाराने फक्त खड्डेच केले… त्यांचा हेतू नसावा, पण त्यांनी ते केले. खड्डे खणत असताना त्यांनी 6 दशके वाया घालवल्याचे ते म्हणाले. ज्यावेळी हे खड्डे खंडले जात होते त्यावेळी जगातले छोटे छोटे देशही यशाच्या शिखरांना स्पर्श करत होते.
आदिवासींच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींचे योगदान सोनेरी पानांनी भरलेले आहे. परंतु अनेक दशके आदिवासी समाज विकासापासून वंचित राहिल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी समर्पित भावनेने काम केले असते, तर आम्हाला एवढे कष्ट करावे लागले नसते. अटलजींच्याच सरकारमध्ये पहिल्यांदा आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
खरगेंना दिले प्रत्युत्तर
यावेळी मोदींनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. एकट्या कलबुर्गीमध्ये 8 लाखांहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत. जनता तुम्हाला नाकारतेय म्हणून तुम्ही इथे रडत आहात असे मोदी म्हणाले.