Disney layoff : मंदीचं मळभ अधिक गडद! डिस्नेकडून कपातीची घोषणा; 7 हजार कर्मचाऱ्यांवर गंडांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Disney layoff

Disney layoff : मंदीचं मळभ अधिक गडद! डिस्नेकडून कपातीची घोषणा; 7 हजार कर्मचाऱ्यांवर गंडांतर

Disney layoff : अमेरिकन कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचं सत्र काही केल्या थांबताना दिसून येत नाहीये. कंपनीने नुकत्याच केलेल्या तिमाही कमाईची घोषणेनंतर लगेचच हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

दिग्गज कंपन्यांच्या कर्मचारी कपातीच्या रांगेत आता वॉल्ट डिस्नेचाही समावेश झाला आहे. कंपनीकडून सात हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

डिस्ने संपूर्ण कंपनीतील खर्च कमी करण्यासाठी कंपनीने 7,000 कामगारांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. कामाच्या संरचनेची पुनर्रचना करण्याची आणि खर्च कमी करण्यासाठी नोकर्‍या कमी करण्याचा विचार करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने बुधवारी सांगितले की, सीईओ पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बॉब इगर यांचा हा पहिला मोठा निर्णय मानला जात आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली होती.

डिस्नेच्या 2021 च्या वार्षिक अहवालानुसार, जगभरात कंपनीचे 1,90,000 कर्मचारी आहेत. त्यापैकी 80 टक्के पूर्णवेळ आहेत. मात्र, कंपनीच्या कापातीच्या निर्णयानंतर ही संख्या 3.6 टक्क्यांनी कमी होईल.

खर्च कमी करण्याचे आव्हान

Disney च्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने Disney + Hotstar ने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 3.8 दशलक्ष सशुल्क सदस्य गमावले आहेत. डिस्ने+ हॉटस्टारची सदस्य संख्या या तिमाहीत 57.5 दशलक्ष इतकी होती, जी मागील तिमाहीतील ६१.३ दशलक्ष वरून 6 टक्क्यांनी कमी आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टारचे भारतातील ओटीटी मार्केटवर वर्चस्व आहे. भारतीय ओटीटी मार्केटमध्ये हॉटस्टारचा बाजार हिस्सा 29% च्या जवळ आहे. Amazon कडे 1.70 कोटी, Netflix कडे 50 लाख तर Disney Plus Hotstar चे 5 कोटी पेक्षा जास्त सशुल्क सदस्य आहेत.

टॅग्स :jobJob NewsRecession