esakal | बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ - मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi,

बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ - मोदी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या वतीनं संयुक्तपणे करण्यात आलं होतं. हवामान पद्दतीत बदल होत असून नद्या, जंगलं संकटात असल्याचा उल्लेख करत निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं महत्वाची असल्याचं, यावेळी मोदी (PM modi) यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना हे मोठं आव्हान असून आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही. सध्या जगासमोर हवामान बदलाचं सर्वात मोठं संकट उभं आहे, धृवांवरील बर्फ वितळत आहे. जग एका मोठ्या संकटातून जात आहे. अशा वेळी गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग महत्वाचा आहे. निसर्गाचा आदर करणे, पृथ्वीचे संवर्धन करणे ही गौतम बुद्धांची शिकवण आहे. आपल्यातील काही घटक हे समाजात तिरस्कार परसरवत आहेत. हे मानवतेसाठी धोकादायक आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: Twitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर का?

नरेंद्र मोदींनी यावेळी पुन्हा एकदा पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक यांचा उल्लेख करत सलाम केला.