PM Modi: मोदी बोलायला उभे राहताच विरोधकांचा मोठा गोंधळ; लोकसभा अध्यक्ष विरोधकांवर प्रचंड संतापले

NEET च्या घोटाळ्यावर, मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करा अशी मागणी ते करत होते.
PM Modi: मोदी बोलायला उभे राहताच विरोधकांचा मोठा गोंधळ; लोकसभा अध्यक्ष विरोधकांवर प्रचंड संतापले

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देण्यासाठी लोकसभेत उभे राहिले तोच विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजीला सुरुवात केली. हा गोंधळ इतका प्रचंड होता की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे प्रचंड संतापले आणि त्यांनी विरोधकांना सुनावलं. (PM Modi stood up to speak in Loksabha opposition made big fuss Lok Sabha Speaker was very angry)

विरोधकांनी मोदींच्या भाषणादरम्यान जोरजोरात घोषणााबाजी करत होते. हुकुमशाही बंद करा, हुकुमशाही बंद करा अशा घोषणा ते देत होते. त्याचबरोबर NEET च्या घोटाळ्यावर, मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करा अशी मागणी ते करत होते. यावेळी विरोधकांचा प्रचंड गोंधळ पाहून लोकसभा अध्यक्ष विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि इतरांवर चांगलेच संतापले. तुमचं असं वागणं हे सभागृहाच्या परंपरेला शोभा देत नाही, असं ते जोरजोरात बोलत होते.

PM Modi: मोदी बोलायला उभे राहताच विरोधकांचा मोठा गोंधळ; लोकसभा अध्यक्ष विरोधकांवर प्रचंड संतापले
Ladki Bahin Yojana: पतीला सोडून पळून गेली पत्नी...'लाडकी बहीन योजने'च्या पैशांमुळे पकडली, नेमकं काय घडलं?

ओम बिर्ला म्हणाले, "आम्ही विरोधीपक्ष नेत्यांसह विरोधकांना आपली बाजू मांडायला पुरेसा वेळ दिला आहे. तरी देखील जर तुम्ही असा गोंधळ घालत असाल तर हे ठीक नाही. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अशा पद्धतीनं संसदेच्या मर्यादेचं उल्लंघन करता कामा नये. तुम्ही वेलमधून जाऊन आपल्या जागेवर बसावं. तुम्हाला पुरेसा वेळ, पुरेशी संधी दिलेली आहे. तुम्हाला मी ९० मिनिटांचा वेळ बोलायला दिला आहे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com