प्रत्येकाला मिळणार युनिक हेल्थ आयडी; मोदींकडून योजनेचा होणार शुभारंभ

Narendra Modi
Narendra ModiSakal

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री डिजीटल स्वास्थ्य मिशन (पीएम-डीएचएम) योजनेचा शुभारंभ करणार आहेत. याआधी ही योजना राष्ट्रीय डिजीटल स्वास्थ्य मिशन (एनडीएचएम) च्या नावाने सुरु होती. अधिकाऱ्यांनी बुधवारी म्हटलंय की, पीएम-डीएचएम डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या विस्तृत श्रेणीच्या माध्यमातून सुलभ, सर्वसमावेशक, कार्यक्षम, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने आरोग्य सुविधा प्रदान करते, याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.

Narendra Modi
LIC | भारत विमा क्षेत्रातील चिनी गुंतवणूक रोखणार?

या योजनेअंतर्गत, नागरिकांना एक डिजीटल हेल्थ आयडी पुरविली जाईल. या आयडीमध्ये त्या व्यक्तीच्या आरोग्यसंदर्भातील सगळे रेकॉर्ड्स उपलब्ध असतील. हा हेल्थ आयडी प्रत्येक नागरिकासाठी एकमेव असा असेल. आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या आधारावर त्याची निर्मिती करण्यात येईल. प्रधानमंत्री डिजीटल हेल्थ मिशनचा उद्देश भारताची आरोग्य सेवा प्रणाली अधिक चांगली करणे हा आहे. याद्वारे हेल्थकेअरच्या गरजांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणे शक्य होईल. तसेच अशा सेवा देणाऱ्या संस्थांपर्यंत पोहोचणे देखील सोपे होणार आहे.

Narendra Modi
LIC | भारत विमा क्षेत्रातील चिनी गुंतवणूक रोखणार?

प्रधानमंत्री डिजीटल हेल्थ मिशन केंद्र सरकारची एक पायलट प्रोजेक्ट योजना आहे. ही योजना सध्यातरी पायलट प्रोजेक्ट पद्धतीने राबवली जात आहे. याअंतर्गत केंद्र शासित प्रदेश अंदमान-निकोबार द्वीप समूह, चंदीगढ, दादरा आणि नगर हवेली आणि दमन-दीव, लडाख, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरीमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com