लसीकरणासंदर्भात पंतप्रधान मोदींची बुधवारी महत्त्वाची बैठक

जी २० (G 20) परिषदेवरुन भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेणार आहेत.
narendra modi
narendra modisakal
Updated on

नवी दिल्ली: कमी प्रमाणात लसीकरण (Vaccination) झालेल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) बुधवारी बैठक करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (Pm office) दिलेल्या माहितीनुसार, जी २० (G 20) परिषदेवरुन भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेणार आहेत.

ज्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा पण कमी लसीकरण झाले आहे, म्हणजे पहिल्या डोसचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे आणि दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश करण्यात आला आहे.

narendra modi
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; धनंजय मुंडेंचं सूचक विधान

झारखंड, मनीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील. ४० पेक्षा अधिक जिल्हे आहेत. या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा बैठकीला उपस्थित असतील. पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसाच्या जी २० परिषदेसाठी रोम मध्ये आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकल यांच्यासोबतही बैठक करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com