'ग्लोबल कोविड समिट'मध्ये PM मोदी होणार सहभागी; बायडन यांचं निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi to participate in second global covid virtual summit on Joe Biden invitation

'ग्लोबल कोविड समिट'मध्ये PM मोदी होणार सहभागी; बायडन यांचं निमंत्रण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १२ मे रोजी दुसऱ्या ग्लोबल कोविड व्हर्च्युअल समिट (Global Covid Summit) मध्ये सहभागी होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांना यासाठी आमंत्रित केले आहे.

22 सप्टेंबर रोजी बिडेन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या ग्लोबल कोविड व्हर्च्युअल समिटमध्येही मोदी सहभागी झाले होते. दरम्यान पंतप्रधान मोदी हे या व्हर्च्युअल समिटच्या उद्घाटन सत्रात, 'Pendemic Fatigue आणि 'Prioritize Preparedness' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

सर्वांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या लसी, औषधे, चाचणी आणि उपचारांसाठी कमी किमतीच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, जीनोमिक सर्व्हेलन्स आणि आरोग्य सेवा कर्मचार्‍यांमध्ये क्षमता निर्माण करून साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा: नवनीत राणांच्या लिलावती रुग्णालयातील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल

Web Title: Pm Modi To Participate In Second Global Covid Virtual Summit On Joe Biden Invitation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top