Independence Day : मोदींनी आज भाषणाचा विक्रम केला असता पण..

वृत्तसंस्था
Thursday, 15 August 2019

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत एकूण 93 मिनिटांचं भाषण केलं. त्यांच्या इतर भाषणांच्या तुलनेत हे दुसऱ्या क्रमांकाचे जास्त काळ चाललेले भाषण होते. यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये 94 मिनिटांचं भाषण केलं होतं.​

स्वातंत्र्यदिन
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत एकूण 93 मिनिटांचं भाषण केलं. त्यांच्या इतर भाषणांच्या तुलनेत हे दुसऱ्या क्रमांकाचे जास्त काळ चाललेले भाषण होते. यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये 94 मिनिटांचं भाषण केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी सर्वाधिक वेळ भाषण देण्याचा रेकॉर्ड माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावे होता. त्यांनी 1947 मध्ये त्यांनी 72 मिनिटे भाषण देत देशाला संबोधित केलं होतं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 15 ऑगस्टला त्यांच्या कार्यकाळा दरम्यान सरासरी 30 ते 35 मिनिटे भाषण केलं होतं. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरासरी 30 ते 35 मिनिटांचे भाषण केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2014 मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांचं भाषण 65 मिनिटे सुरू होतं. त्यानंतर 2015 मध्ये 86 मिनिटे, 2017 मध्ये 56 मिनिटे आणि 2018 मध्ये 65 मिनिटे त्यांनी देशाला संबोधित केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pm Modi Todays speech 93 minutes