PM Modi Turban : प्रजासत्ताक दिनी PM मोदींच्या फेट्यानं पुन्हा वेधलं सर्वांचं लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Turban

PM Modi Turban : प्रजासत्ताक दिनी PM मोदींच्या फेट्यानं पुन्हा वेधलं सर्वांचं लक्ष

PM Modi Turban : स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खास पोशाखात दिसतात. त्याप्रमाणे आज ७४ व्या प्रजासत्ताक दिनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खास पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

आजच्या प्रजासत्ताक दिनी मोदींच्या फेट्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यात आज वसंत पंचमी आहे. याच खास दिनाचे औचित्य साधत मोदींनी हा खास फेटा घातल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत मोदी विविध प्रकारच्या फेट्यांमध्ये दिसून आले आहे. आज परिधान केलेल्या फेट्यामध्ये पिवळा आणि भगवा रंग प्रकर्षाने दिसून आला. 2016 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मोदी पिवळ्या रंगाच्या फेट्य त दिसून आले होते.

हेही वाचा: Republic Day : कर्तव्य पथावर अवतरला महाराष्ट्रातील 'नारीशक्तीचा जागर'!

तर, 2017 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडदरम्यान मोदींनी पांढर्‍या बॉर्डरसह गुलाबी रंगाचा फेटा घातला होता. त्यानंतर 2018 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंतप्रधानांनी लाल आणि पिवळ्या रंग असलेला फेटा परिधान केला होता.

2019 मध्ये, पंतप्रधानांनी सोनेरी पट्टे असलेला लाल फेटा घातला होता. 2021 मध्ये, पंतप्रधानांनी जामनगरच्या राजघराण्याने भेट दिलेली लाल रंगाचा फेटा परिधान केला होता. तर, 2022 मध्ये मोदींनी उत्तराखंडची पहाडी टोपी परिधान केली होती.

हेही वाचा: 74th Republic Day : साडेतीन शक्तिपीठे, नारीशक्ती; महाराष्ट्राच्या चित्ररथाचे लक्षवेधी Photos

स्वातंत्र्यदिनाच्या पगडीत पाहण्यास मिळाली तिरंग्याची झलक

2022 च्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फेट्यामध्ये तिरंग्याची झलक पाहण्यास मिळाली. भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा हा फेटा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.