...आणि ट्विटरवर सुरू झाला पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जुलै 2020

जागतिक राजकीय नेत्यांच्या ट्विटर फॉलोअरच्या संख्येनुसार मोदी सध्या तिसऱ्या स्थानावर आहेत. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवरील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या प्रत्येक निर्णयाची, विविध विषयांची माहिती सतत मोदी ट्विटद्वारे देत असतात. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून म्हणजेच २००९ पासूनच त्यांचं ट्विटर हँडल अॅक्टिव्ह आहे. रविवारी त्यांच्या फॉलोअरच्या संख्येने नवा उच्चांक गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर झेप घेतली असून, केवळ दहा महिन्यांमध्ये त्यांच्या फॉलोअरच्या संख्येत एक कोटी लोकांची भर पडली आहे. 

जागतिक राजकीय नेत्यांच्या ट्विटर फॉलोअरच्या संख्येनुसार मोदी सध्या तिसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत बराक ओबामा पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्या फॉलोअरची संख्या मोदींपेक्षा दुप्पट आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानावर आहेत.

हे वाचा - जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार

जगातील एकूण टॉप ट्विटर फॉलोअर असलेल्या लोकांच्या यादीतही मोदी यांचे १५ वे स्थान आहे. देशातील राजकीय नेत्यामध्ये राहुल गांधी यांना १.५२ कोटी, तर गृहमंत्री अमित शहा यांना २.१६ व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना १.७८ कोटी फॉलोअर आहेत. 

जगातील टॉप पाच ट्विटर अकाऊंट 
नाव, फॉलोअर (संख्या कोटीमध्ये) 

 1. बराक ओबामा - १२.९ 
 2. जस्टीन बीबर - ११.२ 
 3. केटी पेरी - १०.८ 
 4. रिहाना - ९.७ 
 5. टेलर स्विफ्ट - ८.६ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगातील टॉप पाच राजकीय नेते 
नाव, फॉलोअर (संख्या कोटीमध्ये) 

 1. बराक ओबामा १२.९ 
 2. डोनाल्ड ट्रम्प - ८.३७ 
 3. नरेंद्र मोदी - ६ 
 4. रेसेप तैय्यप एर्दोगेन - १.६३ 
 5. जोको विडोडो - १.४ 

देशातील टॉप पाच ट्विटर अकाऊंट 
नाव, फॉलोअर (संख्या कोटीमध्ये) 

 1. नरेंद्र मोदी - ६ 
 2. अमिताभ बच्चन - ४.३४ 
 3. सलमान खान ४.१२ 
 4. शाहरूख खान - ४.०८ 
 5. अक्षय कुमार ३.७८

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi twittter handel cross 60 million followers