जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार

पीटीआय
Sunday, 19 July 2020

सायबर हल्लेखोरांनी ट्विटर कंपनीच्याच काही निवडक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या गोपनीय माहितीचा वापर केला, असा दावा या कंपनीने केला. जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार झाल्याने खळबळ माजली.

नवी दिल्ली - सायबर हल्लेखोरांनी ट्विटर कंपनीच्याच काही निवडक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या गोपनीय माहितीचा वापर केला, असा दावा या कंपनीने केला. जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार झाल्याने खळबळ माजली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सायबर हल्लेखोरांनी बराक ओबामा, बिल गेट्स, एलॉन मस्क, जेफ बेझोस अशा दिग्गज लोकांचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावरून खोट्या पोस्ट केल्या होत्या. त्यात बिटकॉईनची गुंतवणूक करून तिप्पट परतावा देण्याचे आश्वासन होते. या बड्या नावांवर विश्वास ठेवून अनेकांनी बिटकॉईन गुंतवले आणि ते फसले. यानंतर ट्विटर कंपनीने हल्ल्याचे विश्लेषण करत एक निवेदन आज प्रसिद्ध केले आहे.  काही कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून हा हल्ला झाल्याचे कंपनीने सांगितले असले तरी अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने माहिती जाहीर केलेली नाही. 

असा केला हल्ला

  • सोशल इंजिनिअरिंगच्या एका योजनेद्वारे काही कर्मचाऱ्यांवर जाळे
  • त्यांच्याकडील गोपनीय माहितीचा वापर
  • त्याद्वारे १३० प्रभावशाली व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक केले
  • काही अकाउंटचे पासवर्ड बदलून त्याद्वारेही बनावट पोस्ट

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter accounts of many big people around the world have been hacked and Bitcoin has been misused