
नवी दिल्ली : ‘‘आपल्याला २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यांनी विकासाची गती वाढवावी,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत बोलताना केले. ‘केंद्र आणि राज्यांनी एक टीम म्हणून काम करावे,’ अशी भावनिक सादही त्यांनी घातली. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पंतप्रधानांनी प्रथमच राज्यांशी संवाद साधला.