esakal | PM मोदी करणार ७७५ कोटींच्या 'डिफेन्स कॉम्ल्पेक्स'चे उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

PM मोदी करणार ७७५ कोटींच्या 'डिफेन्स कॉम्प्लेक्स'चे उद्घाटन

sakal_logo
By
सुधीर काकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत केंद्र सरकारकडून तयार केल्या गेलेल्या दिल्लीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी असून, तब्बल ७००० कर्मचारी काम करु शकतील एवढी या कार्यालयाची क्षमता आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार सध्या संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या कार्यालयांतून काम करतात. आता नवीन तयार होणाऱ्या डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये (Defense ministry complex) या सर्व कर्मचाऱ्यांना स्थलांतरीत केले जाणार आहेत.

संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी सध्या काम करत असलेल्या दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये असललेल्या वेगवेळ्या कार्यालयातील अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये आता हे सर्व कर्मचारी स्थलांतरीत केले जाणार आहेत. दिल्लीतील कस्तूरबा गांधी मार्ग परिसरात ४,५२००० स्क्वेअर फुट क्षेत्रात आणि चाणक्यपुरी परिसरातील आफ्रीका एव्हेन्युमध्ये ५ लाख स्केअर फुट क्षेत्रात हे कार्यालयं तयार केले जाता आहेत.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सराकरने मंजूर केलेल्या ७७५ करोड रुपयांतून हे कार्यालयं तयार करण्यात आले आहेत. नवीन डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये नौदल, आयएनएस इंडिया नेव्हल स्टेशन, आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिस सारख्या कार्यालयांसहीत सीएसडी कँटीन देखील स्थलांतरीत होणार आहे. हे सर्व कार्यालयं नव्या इमारतीमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टसाठी मोठी जमीन मोकळी होणार आहे.

हेही वाचा: "...तर RSS केंद्र सरकारला देशद्रोही म्हणाल का?"

दरम्यान, केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा’चे बांधकाम जानेवारीमध्ये सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ महिनाभरापूर्वी पार पडला होता. टाटा प्रोजेक्टस लि.कडून बांधल्या जाणाऱ्या या इमारतीसाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या बांधकामाला ३५ दिवस विलंबाने सुरुवात झाली असली तरी, बांधकाम वेळेवर पूर्ण करण्याची ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

loading image
go to top