esakal | पंतप्रधान मोदी होणार 'क्लायमेट समिट'मध्ये सहभागी; बायडन यांनी दिलेलं निमंत्रण

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान मोदी होणार 'क्लायमेट समिट'मध्ये सहभागी; बायडन यांनी दिलेलं निमंत्रण

पंतप्रधान मोदी होणार 'क्लायमेट समिट'मध्ये सहभागी; बायडन यांनी दिलेलं निमंत्रण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या 22 आणि 23 एप्रिल रोजी होणाऱ्या 'क्लायमेट समिट'मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. ते निमंत्रण पंतप्रधान मोदींनी स्विकारल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाद्वारे देण्यात आली होती. हे समिट व्हर्च्यूअली पद्धतीने होणार आहे. त्यानुसार आता पंतप्रधान मोदी 'क्लायमेट समिट'मध्ये येत्या 22 आणि 23 एप्रिल रोजी सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदी 22 एप्रिल रोजी पहिल्या सत्रात आपलं मत मांडतील. हे सत्र सायंकाळी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान होणार असून 'Our Collective Sprint to 2030' या विषयावर ते मनोगत व्यक्त करणार आहेत. मेजर इकॉनॉमिक फोरमचे सदस्य असलेले देशांचं नेतृत्व करणारे नेते या समिटमध्ये असतील. भारतदेखील या फोरमचा एक सदस्य आहे. जवळपास 40 जागतिक नेते या समिटमध्ये सहभागी होणार आहेत. सहभागी झालेले नेते हवामानातील बदल, त्यामध्ये सुधार, निसर्गावर आधारित उपाय, हवामान सुरक्षितता तसेच उर्जेसाठी तांत्रिक नवीन कल्पना या विषयांवर चर्चा करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.