PM मोदी अन् राष्ट्रपती मूर्मूंकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM मोदी अन् राष्ट्रपती मूर्मूंकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा!

PM मोदी अन् राष्ट्रपती मूर्मूंकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा!

PM Modi Diwali Wishes : संपूर्ण देशात दिवाळीचे मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आज संध्याकाळी मोठ्या भक्तीभावाने लक्ष्मी पूजन केले जाणार आहे. या उत्सावाच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्टपती जगदीप धनखर यांनी ट्वीट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रकाश आणि आनंदाच्या या पवित्र सणानिमित्त ज्ञानाचा आणि ऊर्जेचा दीप प्रज्वलित करून गरजूंच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करूया. सर्व देशवासियांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो अशी प्रार्थना मूर्मू यांनी शुभेच्छा देताना केली आहे.

पीएम मोदींनी ट्विट करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीट करत देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळी सण तेज आणि प्रकाशाशी आहे. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा भाव घेऊन येवो, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.

दुसरीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनीही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देता म्हटले आहे की, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! तेजस्वी प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात बुद्धी, मंगल आणि समृद्धी घेऊन येवो. झगमगत्या दिव्यांची आभा आपल्या देशाला आशा, आनंद, आरोग्य आणि समरसतेने उजळून टाकू दे अशी आशा धनखर यांनी व्यक्त केली आहे.