
Narendra Modi : PM मोदींच्या भावाचं आंदोलन; 'जंतरमंतर'वर धरणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी हे दिल्लीत एका आंदोलनात सामील झाल्याचं दिसून आलं आहे. दिल्लीतल्या जंतरमंतरवर हे आंदोलन काल झालं. या आंदोलनात प्रल्हाद मोदी व्यासपीठावर बसले होते. अखिल भारतीय रास्त भाव दुकान संघटनेच्या इतर अनेक सदस्यांसह त्यांनी घोषणाबाजीही केली. (PM Narendra Modis brother Prahlad Protesting in Delhi)
हेही वाचा: सामान्य नागरिकाला संविधानातील आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी : नरेंद्र मोदी
आमच्या संघटनेचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करेल, ज्यात आमच्या दीर्घकालीन मागण्यांची यादी केली जाईल. राहणीमानाच्या खर्चात वाढ आणि दुकाने चालवण्यासाठी जादा खर्चाच्या सध्याच्या परिस्थितीत, आमच्या मार्जिनमध्ये प्रति किलो फक्त २० पैसे वाढ करणे ही एक क्रूर चेष्टा आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की आम्हाला दिलासा द्यावा आणि आमच्या आर्थिक संकटांचा अंत करण्यात यावा," अशी भावना प्रल्हाद मोदी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: सशक्त सरकारची कल्पना ‘एनडीए’ने बदलली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ते पुढे म्हणाले की संघटना बुधवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेईल आणि त्याआधारे त्यांची पुढील कृती ठरवली जाईल. संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी सांगितलं की ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटण्याची योजना आखत आहेत. तांदूळ, गहू आणि साखरेच्या नुकसानीची भरपाई आणि खाद्यतेल आणि डाळींच्या रास्त भाव दुकानांमधून पुरवठा करण्याची मागणी करत आहे.
Web Title: Pm Modis Brother Prahlad Modi Stages Dharna With Fair Price Shops Dealers In Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..