
पाटणा : बिहारमधील ‘व्होटर अधिकार’ यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातुःश्रींबद्दल आक्षेपार्ह भाषेत विधान केल्याप्रकरणी पंतप्रधानांनी आज (ता. २) तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘माझ्या स्वर्गीय आईबद्दल वापरलेल्या अश्लील शब्दांतील टीकेमुळे मनापासून व्यथित झालो असून, मी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला कदाचित माफ करीन; परंतु बिहारची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,’’ असे पंतप्रधान म्हणाले. बिहारमधील स्वयंसहायता गटांशी संबंधित महिलांसाठी नव्या सहकारी संस्थेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदींनी उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.