PM Modi's Swearing-In Ceremony : तेलुगू देसम, जेडीयूचा महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रह

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या रचनेवरून ‘एनडीए’मध्ये पहिल्यांदाच जोरदार बैठकांचे सत्र सुरू असून यात कोणाला संधी मिळणार, यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.
PM Modi's Swearing-In Ceremony
PM Modi's Swearing-In Ceremonysakal

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या रचनेवरून ‘एनडीए’मध्ये पहिल्यांदाच जोरदार बैठकांचे सत्र सुरू असून यात कोणाला संधी मिळणार, यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) व जनता दल युनायटेड (जेडीयू) या दोन महत्त्वपूर्ण पक्षांनी महत्त्वाच्या खात्यावर दावा केल्याने मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये अडथळे येत आहेत.

नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ४० जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यात भाजपचा वाटा निम्मा राहणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान मिळणाऱ्यांत अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, शिवराज सिंह चौहान, गजेंद्र शेखावत या प्रमुख नेत्यांसह प्रादेशिक व जातीय समीकरण जुळविण्यात येईल. राज्यमंत्र्यांमध्ये केरळमधून पहिल्यांदा भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेले अभिनेते सुरेश गोपी व आंध्र प्रदेशातून निवडून आलेल्या डी. पुरंदेश्वरी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

PM Modi's Swearing-In Ceremony
PM Modi's Swearing-In Ceremony : गडकरी, गोयल, जाधव, भुमरे, पटेल यांना संधी?

‘रेल्वे’ खात्यासाठी ‘जेडीयू’चा आग्रह

रेल्वे खात्याचे मंत्रिपद मिळावे यासाठी जेडीयूचा आग्रह राहणार आहे. यापूर्वीही एनडीएच्या काळात जेडीयूकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी राहिली आहे. यामुळे या वेळीही जेडीयू या खात्यासाठी आग्रही राहणार आहे. या पदासाठी खासदार लल्लन सिंग, राममोहन ठाकूर हे शर्यतीत असल्याचे सांगण्यात येते.

जेडीयूला दोन कॅबिनेट तेवढेच राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिवाय बिहारमधील ‘लोजप’चे पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांची मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे, तसेच या पक्षातील एकाला राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

चिराग पासवान यांनी कृषी खात्याची मागणी केली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com