esakal | PM मोदींनी २० वर्षे एकही सुट्टी न घेता काम केलं - अनुराग ठाकूर
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

PM मोदींनी २० वर्षे एकही सुट्टी न घेता काम केलं - अनुराग ठाकूर

sakal_logo
By
सुधीर काकडे

आधी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान असा सत्तेतील २० वर्षांचा कार्यकाळ नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केला. या संपुर्ण कालावधीत त्यांच्यावर अनेकांनी आरोप झाले, वैयक्तीक टीका झाली मात्र ते आणखीच ताकदवान होत गेले आणि त्यांचे कर्तृत्व आणखीच उजळले तसेच त्यांना काम करायला ताकद मिळाली अशा भावना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपदच भुषवले नाही तर प्रधान सेवक आणि मुख्य सेवक म्हणून काम केले असे म्हणत अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या कामाच्या पहिल्या दिवसापासून सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे ब्रीद घेऊन काम केलं असेही यावेळी ठाकूर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामावरून एकही दिवस सुट्टी घेतली नाही: अनुराग ठाकूर

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आले, तेव्हा ते म्हणाले की, आपले सरकार गरीब, मागास आणि वंचित लोकांचे असेल. सुशासन, समर्पण आणि सेवेच्या उद्देशाने, पंतप्रधान मोदींनी ऐतिहासिक 20 वर्षे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, मला वाटते की त्यांनी आपल्या कामातून एक दिवस सुट्टी घेतली नाही.

हेही वाचा: भाजप खासदाराच्या गाडीने चिरडल्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप; एक जखमी

पंतप्रधान होण्याची कल्पना केली नव्हती: नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण कधीही कल्पना केली नव्हती मात्र आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळानंतर लोकांच्या आशीर्वादाने देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचता आले. 20 वर्षांचा हा अखंड प्रवास आज 21 व्या वर्षात प्रवेश करत आहे. अशा महत्त्वाच्या प्रसंगी, आपण अशा भूमीवर येणे हा एक मोठा योगा-योग आहे. कारण या भूमीने आपल्याला सतत आपुलकीची वागणुक दिली आहे. 100 वर्षांच्या या सर्वात मोठ्या संकटाला आपण ज्या शौर्याने सामोरं जात आहोत ते जग पहात आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी भारताने इतक्या कमी वेळात तयार केलेल्या सुविधा आपल्या देशाची क्षमता दर्शवतात असेही ते यावेळी म्हणाले.

loading image
go to top