PM Narendra Modi 7 programmes 8 cities journey of 5300 km politics delhi
PM Narendra Modi 7 programmes 8 cities journey of 5300 km politics delhiesakal

PM Narendra Modi : ३६ तास.. ८ शहरे...५,३०० किमीचा प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्यापासून विक्रमी दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सोमवारचा दिवस एक नवा विक्रम प्रस्थापित करणारा ठरणार आहे. मोदी हे ३६ तासांमध्ये आठ शहरांतील सात कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून यासाठी ते तब्बल ५ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

सर्वप्रथम पंतप्रधान मोदी हे मध्य भारतात दिल्ली ते मध्यप्रदेश असा प्रवास करतील त्यानंतर ते दक्षिणेकडे केरळच्या दिशेने झेपावतील. त्यानंतर ते पश्चिमेकडे दादर नगर हवेली आणि दमण दिवूलाही भेट देतील, येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पंतप्रधान दिल्ली ते खजुराहो असा पाचशे किलोमीटरचा प्रवास करतील आणि त्यानंतर पंचायती राज दिनानिमित्त रेवा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील. यानंतर पुन्हा खजुराहोच्या दिशेने येण्यासाठी त्यांना २८० किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. येथून ते पुन्हा कोचीला रवाना होणार आहे.

यासाठी ते तब्बल १ हजार ७०० किलोमीटरचा प्रवास करतील. कोचीमध्ये ते युवा संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. मोदी मंगळवारी सकाळी कोची ते तिरुअनंतपुरम असा प्रवास करतील यासाठी ते तब्बल १९० किलोमीटरचा प्रवास करतील. येथेच ते ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा दाखवतील आणि विविध प्रकल्पांची पायाभरणी देखील यावेळी पार पडेल. येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते सुरतमार्गे सिल्वासाला जातील. यावेळी ते १ हजार ५७० किलोमीटरचा हवाई प्रवास करतील.

सिल्वासात नमो कॉलेजला भेट

सिल्वासा येथे पंतप्रधान मोदी नमो मेडिकल कॉलेजला भेट देतील यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण होईल त्यानंतर दमण येथील देवका सीफ्रंटच्या उद् घाटनासाठी ते रवाना होतील यासाठी ते ११० किलोमीटरचा प्रवास करतील. पुन्हा सुरत येथून मोदी दिल्लीच्या दिशेने येतील यामुळे त्यांच्या प्रवासाच्या अंतरात ९४० किलोमीटरची भर पडेल. पंतप्रधान मोदी हे ५ हजार ३०० किलोमीटरचा हवाई प्रवास करतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com