दोन वर्षानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद दिसणार नाही - नायब राज्यपाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद दिसणार नाही - नायब राज्यपाल

काश्मीरमध्ये आता परिस्थिती बदलली असून दहशतवाद संपवण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत असल्याचं नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटलं.

दोन वर्षानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद दिसणार नाही - नायब राज्यपाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काश्मीरच्या नागरिकांना जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दोन वर्षानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद दिसणार नाही असा विश्वास दिला आहे. तसंच भारत सरकार या दिशेनं काम करत असल्याचंही सांगितलं. एका कार्यक्रमात बोलताना मनोज सिन्हा यांनी म्हटलं की, आता काश्मीरमधील कायद्या व्यवस्थेत बराच बदल झाला आहे.

मनोज सिन्हा यांनी म्हटलं की, अनेक लोक कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत आहे. पण मी सांगेन की आता परिस्थिती खूप बदलली आहे. काही लोकांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी विश्वास देतो की दोन वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद दिसणार नाही. केंद्र सरकार या दिशेनं काम करत आहे.

हेही वाचा: Haiderpora encounter: निरपराध मुलाला चकमकीत मारले

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी जोरदार मोहिम उघडली आहे. दोन वेगवेगळ्या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना शुक्रवारी ठार केलं गेलं. तसंच कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात शिवराज अहमद आणि यावर अहमद यांना कंठस्नान घालण्यात आलं. शिवराज हा काश्माीर खोऱ्यात २०१६ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. तो मोस्ट वाँटेड दहशतवादी होता.

loading image
go to top