तीन कृषी कायदे मागे घेणार - पंतप्रधान मोदी | PM Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी

कोरोनाच्या काळात आतापर्यंत मोदींनी देशवासियांना दहावेळा संबोधित केलं आहे. आज काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

तीन कृषी कायदे मागे घेणार - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. आज ते अनेक जलसिंचन योजनांचे उद्घाटन उत्तर प्रदेशात करणार आहेत. त्याआधी ९ वाजता मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. कृषी कायदे मागे घेणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. तसंच सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं.

मोदींनी म्हटलं की, देशात लहान शेतकऱ्यांना ताकद मिळावी यासाठी कृषी कायदे लागू करण्यात आले. अनेक वर्षांपासून हे शेतकरी ही मागणी करत होते. याआधीच्या सरकारने यावर चर्चा केली होती. यावेळी चर्चा करून हे कायदे लागू केले गेले. अनेक शेतकरी संघटनांनी या कायद्याचे स्वागत केले. ज्यांनी स्वागत केले त्यांचे मी आभार मानतो.

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी क्षेत्राच्या हिताने काम करत आहे. गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निष्ठेने, शेतकऱ्यांसाठी समर्पणाने हे कायदे आणले. पण तरीही काही शेतकऱ्यांना हे कायदे समजले नाही. कृषी तज्ज्ञांनी त्या शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यांचे तर्क समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा ज्यावर आक्षेप होता ते बदलण्याची तयारी दाखवली. कायदे निलंबित करण्याचा प्रस्तावही मांडला असे मोदी म्हणाले.

देशवासियांची माफी मागून मला हे म्हणावं वाटतं की, आमच्या तपस्येत काही उणीव राहिली असावी. दिव्याच्या प्रकाशाचं महत्त्व आम्ही समजून सांगू शकलो नाही. कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेणार आहे. याची संवैधानिक प्रक्रिया सुरु करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

शेतकऱ्यांविषयी काय म्हणाले मोदी?

देशाने मला २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून सेवेची संधी दिली तेव्हा आम्ही शेतकरी विकासाला प्राधान्य दिलं. लोकांना सत्य माहित नाही की देशातील १०० पैकी ८० शेतकरी हे लहान शेतकरी आहे. त्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. तुम्हाला कल्पना आहे का या लहान शेतकऱ्यांची संख्या १० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांच्या पूर्ण आय़ुष्याचा आधार हा हाच लहान जमिनीचा तुकडा आहे. हेच त्यांचं आयुष्य असतं. याच जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पिढ्यानपिढ्या आणि पुढे कुटुंबाच्या वाट्यात जमिनीचे तुकडे पडतात. अशा शेतकऱ्यांसाठी काम केलं. सरकारने चांगल्या दर्जाचे बियाणे, खते, जलसिंचनासाठी तंत्रज्ञान पुरवले. आम्ही पीक विमा योजना अधिक चांगली केली. त्यात जास्तीजास्त शेतकरी येतील हे पाहिले. आपत्तीत शेतकऱ्यांना सहज नुकसान भरपाई मिळेल यासाठी जुने नियम बदलले. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांना १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भऱपाई शेतकऱ्यांना दिली आहे.

लहान शेतकऱ्यांपर्यंत विमा आणि पेन्शन सुविधा पोहोचवल्या. लहान शेतकऱ्यांच्या गरजा पुरवण्यासाठी त्यांच्या बँख खात्यात एक लाख ६२ हजार कोटी पाठवले. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या बदल्यात उत्पादनाची योग्य किंमत मिळावी म्हणून अनेक पावले उचलली. आम्ही एमएसपी वाढवली पण रिकॉल सरकारी खऱेदी केंद्रही तयार केले. आमच्या सरकारने खरेदी केलेल्या मालाने आधीचे अनेक विक्रम मोडले. देशातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पानद कुठेही विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभारला.

केंद्र सरकारचे कृषी बजेट हे आधीच्या तुलनेत ५ पट जास्त आङे. दरवर्षी १.२५ लाख कोटी रुपये शेतीवर खर्च केले जात आहेत. १ लाख कोटी अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून गोदाम उभारले जात आहेत. तसंच विकास केला जात आहे. लहान शेतकऱ्यांची ताकद वाढवण्यासाठी दहा हजार एफपीओ तयार कऱण्याची मोहीम सुरु आहे. यासाठी ७ हजार कोटी खर्च केले जात आहे.

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. तसंच प्रकाश पर्वानिमित्तही त्यांनी ट्विट केले आहे. राणी लक्ष्मी बाई जयंतीनिमित्त ट्विटरवर त्यांनी म्हटलं की, इतिहासात त्यांचे वेगळे स्थान आहे.

loading image
go to top