esakal | BRICS : कोरोना काळात सामूहिक प्रयत्नांनी मिळालं यश - PM मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi in BRICS Summit

BRICS : कोरोना काळात सामूहिक प्रयत्नांनी मिळालं यश - PM मोदी

sakal_logo
By
सुधीर काकडे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १३ व्या ब्रिक्स परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे १३व्या ब्रिक्स परिषदेचे (BRICS Summit) अध्यक्ष होते. व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पार पडलेल्या या परिषदेत नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर भारताला सर्व सदस्यांकडून पुर्ण सहकार्य मिळाले असे म्हणत सर्व सदस्य राष्ट्रांचे आभार मानले. या परिषदेला ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सानारो, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, रशियाचे राष्ट्राक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देखील या बैठकील ऑनलाईन उपस्थिती दर्शवली होती.

नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत काही महत्वाचे मुद्दे मांडले

  1. ब्रिक्सने गेल्या १५ वर्षात मोठी कामगिरी केली. आज ब्रिक्स म्हणजे जगातील नव्या अर्थव्यवस्थांचा आवाज झाला आहे. विकसनशील देशांच्या प्रमुख गरजांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ब्रिक्स व्यासपीठाने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

  2. पुढच्या १५ वर्षांत ब्रिक्स परिषद चांगलं काम करेल याची खात्री करावी लागणार आहे.

  3. भारताने आपल्या अध्यक्षपदासाठी निवडलेली थीम ही सातत्य, एकत्रीकरण आणि सहकार्य या गोष्टींना चालना देते.

  4. कोरोना महामारीचा काळ असताना सुद्धा, १५०हून जास्त ब्रिक्स बैठका आणि कार्यक्रम आयोजित केले गेले. यातील २० पेक्षा जास्त बैठका या मंत्रीस्तरावर आयोजित केल्या गेल्या होत्या. त्यामाध्यमातून ब्रिक्सने आपले उद्दिष्ट देखील साध्य केले आहेत.

  5. "बहुपक्षीय प्रणालींना बळकट करणे आणि त्यांना सुधारणे" या हेतूंसाठी ब्रिक्सने एक भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच आम्ही ब्रिक्स "काउंटर टेररिझम अॅक्शन प्लॅन" देखील स्वीकारला आहे.

  6. यावेळी पहिल्यांदाच ब्रिक्स डिजिटल आरोग्य परिषद आयोजित केली गेली. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सेवा वाढवण्याच्या हेतूने एक अभिनव पाऊल उचलले. तसेच आमचे जलसंपदा देखील मंत्री नोव्हेंबरमध्ये ब्रिक्सला भेट देतील.

हेही वाचा: ऑगस्ट महिन्यात १९ लाख भारतीयांनी गमावल्या नोकऱ्या - CMIE

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही ब्रिक्स परिषदेला संबोधित केले. यावेळी पुतीन यांनी अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. "जगाला सुरक्षिततेच्या संबंधीत गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अफगाणिस्तानातून माघार घेतल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे आणि त्याचा प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर कसा परिणाम होईल हे अद्याप अस्पष्ट आहे." असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

loading image
go to top