esakal | ऑगस्ट महिन्यात १९ लाख भारतीयांनी गमावल्या नोकऱ्या - CMIE
sakal

बोलून बातमी शोधा

Unemployment

ऑगस्ट महिन्यात १९ लाख भारतीयांनी गमावल्या नोकऱ्या - CMIE

sakal_logo
By
सुधीर काकडे

गेल्या अनेक दिवसांपासून बेराजगारीची (Unemployment Rate) समस्या देशाला भेडसावत असताना त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात ऑगस्ट (August) महिन्यात संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील तब्बल १९ लाख लोकांनी आपला रोजगार गमावला. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील कामगारांचा समावेश आहे. या आकडेवारीसह जुलै महिन्यात ७ टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर आता ८.३ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती सेंटर फॉर मॉनीटरींग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) दिली आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये ३७.५ टक्के असलेला रोजगारीचा दर ऑगस्टमध्ये ३७.५ टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे ३९९.७ दशलक्ष रोजगार कमी होऊन आता ३९७.८ वर आले आहेत. शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतीशी संबंधीत रोजगार कमी झाले आहेत अशी माहिती सीएमआयईकडून मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात कृषी क्षेत्रात ८.७ दशलक्ष रोजगार कमी झाले. तर शेतीशी संबंधीत नसलेल्या क्षेत्रांमध्ये ६.८ दशलक्ष रोजगारांची वाढ झाली. यामध्ये व्यावसायिक स्वरुपातील रोजगारांमध्ये ४ दशलक्ष आणि रोजंदारीने काम करणाऱ्या मजुरांच्या २.१ दशलक्ष रोजगारांमध्ये वाढ झाली. तर ऑगस्ट महिन्यात पगारी नोकऱ्यांमध्ये ०.७ दशलक्षची किरकोळ वाढ झाली.

हेही वाचा: देशात २४ तासांत ४३,२६३ कोरोनाचे नवे रुग्ण, ३३८ जणांचा मृत्यू

महत्वाची बाब म्हणजे शेती क्षेत्रामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या अनेक संधी सेवा क्षेत्राने दिलेल्या सेवांमुळे कमी झाल्या. तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रात कमी असलेल्या म्हणजेच २.५ दशलक्ष नोकऱ्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात आणखी घट झाली. तसेच उत्पादन क्षेत्राने देखील ९ लाख नोकऱ्या कमी केल्या. त्यामुळे कारखाने हे राजगाराचे विश्वसनीय क्षेत्र नाही, असेही सीएमईआयने सांगितले.

loading image
go to top