esakal | ...म्हणून CM चन्नींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi and CM Charanjit Singh channi

...म्हणून CM चन्नींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

sakal_logo
By
सुधीर काकडे

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंजाबमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे त्यांच्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यातच आता चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे. आपण पंतप्रधान मोदी यांना शेतकरी आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांशी पुन्हा संवाद सुरू करण्याची विनंती केली. तसेच आपण त्यांच्याकडे तीन कृषी कायदे मागे घेण्याची देखील मागणी केल्याचे चन्नी यांनी सांगितले. तसेच करतारपुर कॉरीडोअर आणि इतर काही मुद्दयांवर चर्चा झाल्याचे चन्नी यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत तीन मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती चन्नी यांनी दिली. पंजाबमध्ये शेतमाल खरेदीचा हंगाम सामान्यतः 1 ऑक्टोबरला सुरू होतो, परंतु यावर्षी केंद्राने 10 ऑक्टोबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण त्यांना खरेदी हंगाम सुरू करण्याची विनंती केली असल्याची माहिती चन्नी यांनी दिली. तसेच कोविड -19 महामारीमुळे बंद झालेला करतारपूर कॉरिडॉर लवकरात लवकर सुरु केला जावा अशीही विनंत केली असल्याची माहिती चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर दिली आहे.

loading image
go to top