काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांना देशाने नाकारलं; बिहार-युपीत दयनीय अवस्था

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

मोदींनी म्हटलं की, बिहारच्या जनतेने 'डबल युवराजां'ना नकार दिला आहे, आणि पुन्हा एकदा एनडीएचं 'डबल इंजिन' सरकार बनणार आहे. 

बिहारमध्ये आज मंगळवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारमध्ये दोन सभा आहेत. मोदींनी आज अररियातील फारबिसगंजमधील सभेला संबोधित केलं. मोदींनी म्हटलं की, बिहारच्या जनतेने 'डबल युवराजां'ना नकार दिला आहे, आणि पुन्हा एकदा एनडीएचं 'डबल इंजिन' सरकार बनणार आहे. 
ते म्हणाले की, बिहाच्या लोकांनी  फक्त देशाला नव्हे तर जगाला संदेश दिला आहे की, जेंव्हा कोरोनामुळे जगात हाहाकार माजला असला तरीही बिहारचे लोक उत्साहाने मतदान करत आहेत. मोदींनी यासाठी निवडणूक आयोगाचेही अभिनंदन केले. 

हेही वाचा - सॉलिसिटर जनरल 'बिझी'; लोन मॉरेटोरियमवरील सुनावणी ढकलली पुढे​
डबल युवराजांवर मोदींचा वार
मोदी म्हणाले की बिहारच्या जनतेने पहिल्या टप्प्यातील मतदानात स्पष्टपणे एनडीएला मत दिले आहे. त्यांनी जंगलराज आणि डबल युवराजांना नाकारलं आहे. मोदींनी म्हटलं की, आज एनडीएच्या विरोधात जे उभे आहेत त्यांनी एवढं सगळं खाल्ल्यानंतरही बिहारके लोभाने पाहत आहेत. बिहारच्या जनतेला माहितीय की कोण राज्याचा विकास करेल आणि कोण स्वत:च्या कुंटुबाचा. 

काँग्रेसवर केला आरोप
मोदी म्हणाले की, काँग्रेसने खोटं  बोलून देशाला स्वप्न दाखवलं होतं. ते आधी म्हणत होते की, गरीबी हटवू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु, OROP लागू करु याप्रकारच्या बाता काँग्रेसने खूप मारल्या. मात्र, आता काँग्रेसची अवस्था अशी आहे की, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदस्यांना एकत्र केलं तरी काँग्रेसकडे आता 100 खासदारदेखील नाहीयेत. काही राज्यांमध्ये तर काँग्रेसचे खाते देखील उघडले नाहीये. युपी-बिहारमध्ये काँग्रेस चौथ्या आणि पाचव्या नंबरवर आहे आणि कुणाच्या तरी बोटाला पकडून ते उभे राहत आहेत. 

हेही वाचा - खुशखबर : लशीआधीच औषध येण्याची शक्यता; दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वी

बिहारमध्ये घोटाळा हारतोय
मोदींनी म्हटलं की,  बिहारमध्ये परिवारवाद आज हारतोय आणि विकास जिंकतोय. आज बिहारमध्ये अहंकार-घोटाळा हारतोय आणि परिश्रम जिंकतोय. मोदी म्हणाले की, बिहार तो दिवस कधीही विसरु शकत नाही, जेंव्हा निवडणूक प्रक्रीयेला गंमत  बनवून ठेवलं गेलं होतं. यांच्यासाठी निवडणूक म्हणजे  हिंसा, हत्या आणि बूथवर ताबा मिळवणे, असं होतं. ते म्हणाले की तेंव्हा मते हिसकावून घेतली जायची. 
पक्क्या घरांचे दिले वचन

मोदी म्हणाले की, मागच्या दशकांत प्रत्येक घरात गॅस सिलेंडर पोहोचला तर आता या दशकात पाइपने गॅस पोहोचवायचं आहे. मागच्या दशकांत गरीबांना शौचालय मिळाले आणि आता पक्कं घर देण्याचं हे दशक आहे. बिहारला जर परत एकदा डबल इंजिन सरकार मिळालं तर हा विकास अधिक गतिमान होईल. आज कोणत्याही भेदभावाविना लोकांपर्यंत विकास पोहोचत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi araria rally attacked congress bihar election