esakal | खुशखबर : लशीआधीच औषध येण्याची शक्यता; दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

corona medicine

कोरोनाच्या लशीपेक्षा आधी सीएसआयआरद्वारे कोरोनावरील औषध तयार होण्याची शक्यता आहे.

खुशखबर : लशीआधीच औषध येण्याची शक्यता; दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना विषाणू संपूर्ण जगातच हाहाकार माजवत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. अद्यापही कोरोनावरील उपचार सापडले नसल्याने जगात अद्यापही काळजीचे वातावरण आहे. अनेक युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून त्या ठिकाणी पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची परिस्थिती लागू केली आहे. भारतात सध्या कोरोनाची आकडेवारी घसरती असली तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनावरील लशीसाठी जगभरात ठिकठिकाणी प्रयत्न सुरु असले तरी अद्याप यश आले नाहीये. अशातच कोरोनावरील लशीपेक्षा आधी कोरोनावरील औषध येईल अशी माहीती मिळाली आहे. याबाबतची माहीती सीएसआयआरचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राम विश्वकर्मा यांनी दिली आहे.  

हेही वाचा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांतही कलंकित उमेदवार

कोरोनाच्या लशीपेक्षा आधी सीएसआयआरद्वारे कोरोनावरील औषध  तयार होण्याची शक्यता आहे. एमडबल्यू नावाचे या औषधाच्या ट्रायलचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आणि आता या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजूरी मिळाली आहे. 

सीएसआयआरचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राम विश्वकर्मा यांनी सांगितलं की, पहिल्या दोन टप्प्यातील निष्कर्ष चांगले असून ते सकारात्मक आहेत. या निष्कर्षांना नियामकांसमोर ठेवलं असता त्यांनी आता तिसऱ्या टप्प्यासाठी मंजूरी दिली आहे. देशात जवळपास 300 लोकांवर लवकरच हे परिक्षण सुरु होणरा आहे. एम्स, अपोलोसहीत काही निवडक हॉस्पिटल्समध्ये या परिक्षणाची तयारी केली जात आहे. जर तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वी झाली तर पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्येच हे औषध बाजारात येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - Bihar Election Live Updates- दुसऱ्या टप्प्यात तेजस्वींचे भवितव्य ठरणार

त्यांनी म्हटलं की, हे औषध इम्यूनो थेरपीच्या रुपात काम करेल जी उपचार घेणाऱ्या रुग्णाला दिली जाऊ शकते. तसेच निरोगी व्यक्तीला वाचवण्यासाठी दिली जाऊ शकते. दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये हा निष्कर्ष निघाला आहे या औषधाचे सेवन करणारे रुग्ण लवकरात लवकर बरे होत आहेत. त्यांच्यामधील व्हायरस लोड गतीने कमी होत आहे. 

त्यांनी म्हटलं की तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल एम्ससहीत काही निवडक हॉस्पिटलमध्ये होईल. दुसऱ्या टप्प्यातील चाचणी 42 रुग्णांवर झाली होती. तिसऱ्या टप्प्यत 300 लोकांवर परिक्षण केले  होते. हे औषध कुष्ठरोगासाठी आधीपासूनच वापरली जाते. सीएसआयआरने या औषधाला कोरोनासाठीही वापरले आहे. एमडब्ल्यू म्हणजेच मायकोबॅक्ट्रीयम डबल्यू शरीरात बाहेरील संक्रमणाच्या विरोधात लढण्यासाठीची प्रतिकारक शक्ती निर्माण करतो. 
 

loading image