PM मोदी होणार G-20 समिटमध्ये सहभागी; सौदीचे राजा सलमान यांनी दिलंय निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

सौदी अरबचे राजा सलमान यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी या समिटमध्ये सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 व्या G-20 समिटमध्ये सहभागी होणार आहेत. हे संमेलन 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सौदी अरेबियाचे राजा सलमान बिन अब्दुलअजीज अल सऊद यांनी पंतप्रधान मोदींना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. 

हेही वाचा - 'छप्पर फाडके' घरात पडलेल्या दगडाने तरुणाला बनवलं कोट्यधीश
अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की, येणारे G-20 समिट हा वर्षातील दुसरा कार्यक्रम आहे. या संमेलनाची थीम 'सर्वांसाठी 21 शतकातील संधींची जाणीव' अशी आहे. त्यांनी म्हटलं की, सौदी अरबचे राजा सलमान यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी या समिटमध्ये सहभागी होणार आहेत. 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम व्हर्च्यूअल पद्धतीने आयोजित होणार आहे. त्यांनी म्हटलं की शेवटची G-20 समिट मार्च 2020 मध्ये झाली होती. त्यावेळी त्या कार्यक्रमात जागतिक महामारी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासंदर्भात चर्चा झाली होती.

हेही वाचा - नियंत्रण रेषेवर गोळीबार नाही; पिनपॉइंट स्ट्राइकबाबत लष्कराचा खुलासा

यावेळच्या संमेलनाचा विषय COVID-19 पासून बसलेल्या फटक्यातून सर्वच क्षेत्रातून बाहेर पडण्याचा असेल. कार्यक्रमात सर्व 20 देशांचे नेते कोरोनाशी लढण्याची तयारीवर चर्चा करण्यात येणार आहे. समिटमध्ये सहभागी नेते भविष्याला अधिक चांगले बनवण्यासाठीच्या दृष्टीकोनाबाबतही चर्चा करतील. त्यांनी म्हटलं की, भारत G-20 ट्रोईका (या शिखर संमेलनाच्या अध्यक्षतेसाठी तीन सदस्यीय देशांची समिती) मध्ये सौदी अरबसोबत प्रवेश करेल. तर इटली 1 डिसेंबरला G-20 च्या अध्यक्षतेचा पदभार सांभाळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi attend 15th g20 summit king salman bin abdulaziz al saud invited