esakal | नियंत्रण रेषेवर गोळीबार नाही; पिनपॉइंट स्ट्राइकबाबत लष्कराचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

air strike

गेल्या आठवड्यात पाककडून अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं. जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर सातत्याने गोळीबारही केला जातो. 

नियंत्रण रेषेवर गोळीबार नाही; पिनपॉइंट स्ट्राइकबाबत लष्कराचा खुलासा

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पिनपॉइंट स्ट्राइक केल्याचं वृत्त प्रसारित झाल्यानंतर अशा प्रकारे नियंत्रण रेषेवर कोणताही गोळीबार झाला नसल्याचं लष्कराने सांगितलं आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी संधी मिळावी यासाठी पाकच्या लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्यानं भारताने प्रत्युत्तरादाखल स्ट्राइक केल्याचं म्हटलं जात होतं. आता याबाबत भारताच्या लष्कराकडून हे वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे. 

हिवाळ्याच्या दिवसात भारतीय हद्दीत पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना घुसण्यासाठी मदत करते. गेल्या आठवड्यात पाककडून अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं. जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर सातत्याने गोळीबारही केला जातो. 

हे वाचा Jammu Kashmir : सुरक्षादलाला मोठे यश, नगरोटा येथील चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानी सैन्य जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं समर्थन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. त्याशिवाय नियंत्रण रेषेवर भारतीय नागरिकांवर गोळीबारही केला जात आहे. 2019 च्या तुलनेत यंदा जास्त गोळीबार करण्यात आला आहे. 2019 मध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात 18 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर यंदा 21 नागरिकांनी प्राण गमावले आहेत. 
 

loading image
go to top