esakal | कमवते झालात तरी शिकायचं विसरु नका - PM मोदींचा तरुणांना सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी

कमवते झालात तरी शिकायचं विसरु नका - PM मोदींचा तरुणांना सल्ला

sakal_logo
By
नामदेव कुंभार

World Youth Skills Day : सध्याच्या काळात कमवते झाल्यानंतर शिकायचं विसरुन चालणार नाही. सध्याच्या घडीला कौशल्य आणि स्किलला खूप डिमांड आहे. ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल. ही बाब तरुणांवर आणि एखाद्या देशावरही लागू होते, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना दिला आहे. 'स्किल इंडिया मिशन' या योजनेला सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना संबोधित केलं.

तरुणांमधील कौशल्य आणि स्किल डेव्हलपेंट ही देशाची गरज आहे. यातूनच आत्मनिर्भर भारताची निर्मिती होऊ शकते. मागील सहा वर्षांमध्ये अनेक तरुण पुढे आले. नवीन संस्था, कंपन्या तयार झाल्या. मागील सहा वर्षांच्या आधारावर तरुणांच्या स्किलच्या आधारावर आपल्या स्किल इंडिया मिशनला नक्कीच गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा: वाढदिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

दसऱ्याला आपण शस्त्रांची पूजा करतो. अक्षय तृतीया सणावेळी शेतकरी धान्याची अन् शेती अवजाराची पुजा करतात. भगवान विश्वकर्मा यांची पूजा देशातील प्रत्येक स्किल, शिल्प यांच्यासोबत जोडलेल्या लोकांसाठी मोठं पर्व राहिले आहे, असं मोदी म्हणाले.

loading image