esakal | वाढदिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

वाढदिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

वाढदिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

sakal_logo
By
नामदेव कुंभार

अलिबाग उरण मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं गुरुवारी पहाटे निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. मागील तीन ते चार वर्षांपासून ते सतत आजारी होते. वाढदिवशीच मधुकार ठाकूर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आजच म्हणजे १५ जुलै रोजी मधुकर ठाकूर यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली. मागील 3 ते 4 वर्षांपासून मधुकर ठाकूर आजारी होते. गुरुवारी दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी मधुकर ठाकूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा: राज्यात लवकरच महाभरती; MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार

काँग्रेसचे माजी आमदार असणाऱ्या मधुकार ठाकूर यांचा राजकारणात खूप खडतर प्रवास होता. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. मधुकार ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही काम पाहिले.

हेही वाचा: दिलासा नाहीच; राज्यातील कोरोना निर्बंध तुर्तास कायम

हेही वाचा: इंग्लंडमधील भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

loading image