केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न; 15 कॅबिनेट, २८ राज्यमंत्र्यांचा समावेश

Cabinet Ministers
Cabinet Ministers

Union Cabinet Expansion नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. जवळपास 43 मंत्री आता राष्ट्रपती भवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अनेक मंत्र्यांनी आज दिवसभरात राजीनामे दिले आहेत. अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या पदरी चार मंत्रिपदं निश्चित झाली आहे. खासदार नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांचा यात समावेश आहे. 2019 मध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पण, आज मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा फेरबदल केला जात आहे.

कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

  • नारायण राणेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ

    आजच्या शपथविधीच्या सोहळ्याला सर्वांत प्रथम नारायण राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर सरबनंदा सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार यांनी शपथ घेतली आहे. सध्या एकामागून एक नवे चेहरे मंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

दरबार हॉलमध्ये शपथविधीचा कार्यक्रम सुरु होत आहे. पंतप्रधान मोदींच्या नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील दाखल झाले आहेत.

  • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 मंत्र्यांचे राजीनामे स्विकारले आहेत. यामध्ये आयटी मंत्री रविशंकर प्रसाद, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि इतरांचा समावेश आहे.

  • मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोक कल्याण मार्गवर भाजप खासदारांसोबत बैठक घेतली. त्याची काही दृश्ये...

  • ज्योतिरादित्य शिंदे शपथविधीसाठी रवाना

    काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे शपथविधीच्या कार्यक्रमासाठी ते रवाना झाले आहेत.

  • सर्बानंद सोनोवाल शपथविधीसाठी रवाना

    आसामचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते सर्बानंद सोनोवाल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील नाव निश्चित झालं आहे. सध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार असल्यानं सोनोवाल आपल्या घरुन शपथविधीसाठी रवाना झाले.

  • दलित आणि मागासवर्गीयांमधील अनेक नेत्यांना मंत्रीमंडळात संधी दिली गेली आहे. हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेली खेळी आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. लोकांचं भलं व्हावं म्हणून नव्हे तर हे त्यांच्या राजकारणापोटी ते हे करत आहेत.

    - काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जून खर्गे

  • ज्या 43 जणांची मंत्रीमंडळाती वर्णी लागली आहे, त्यांची यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये जोतिरादित्य शिंदे, पशुपती कुमार पारस, भुपेंद्र यादव, अनुप्रिया पटेल इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

  • महाराष्ट्राच्या चार नव्या नेत्यांना मंत्रीमंडळात संधी

    यामध्ये नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड अशी चार नेत्यांची नावे आहेत.

  • मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोक कल्याण मार्गवर भाजप खासदारांसोबत बैठक घेत आहेत.

  • केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्यापूर्वी मंत्रीमंडळातील पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा दिला आहे.

  • केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

  • केराज्यमंत्री अनुराग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडविया, जी. किशन रेड्डी यांना कॅबिनेटमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 11 महिला, 27 ओबीसी, 12 अनुसूचित जाती , 8 अनुसूचित जमाती, 1 मुस्लिम, 1 शिख , 1 बौद्ध, 1 खिश्चन ,1 जैन , 13 वकील , 6 डॉक्टर , 5 इंजिनियर , 7 प्रशासकीय अधिकारी अशा विविध घटकांना स्थान देण्यात आली आहे.

  • महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड यांची नावे निश्चित झाल्याचं सांगितलं जातंय.

  • रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

  • केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतलं आहे. प्रकृती अस्वस्थेमुळे निशंक यांच्याकडून मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या खासदार देबोश्री चौधरी यांनाही डच्चू देण्यात आल्याचं बोललं जात आहे. पश्चिम बंगालमधून इतर चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडूनही मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. कर्नाटकमधील राजकीय अस्थिरतेमुळे केंद्रानं मंत्रिपद काढून घेतलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com