सूर्यग्रहण बघता न आल्याने मोदींनी व्यक्त केली 'ही' खंत

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहणाचे नीट दर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे अनेक देशवासियांचा हिरमोड झाला, अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले. ही खंत त्यांनी ट्विटमधून व्यक्त केली. 

कोझीकोड : देशभारात गेल्या आठवड्यापासूनच सूर्यग्रहणाचे वेध सुरू होते. देशवासिय हे ग्रहण बघण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. मात्र काही राज्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहणाचे नीट दर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे अनेक देशवासियांचा हिरमोड झाला, अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले. ही खंत त्यांनी ट्विटमधून व्यक्त केली. 

'RSSचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलत आहेत'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही देशवासियांप्रमाणेच सूर्यग्रहण बघण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. पण कोझीकोडमधल्या ढगाळ वातावरणामुळे त्यांना सूर्यग्रहण बघता आले नाही. त्यांनी ग्रहण बघता न आल्याची खंत ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, 'अनेक देशवासियांसारखेच मलाही ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण बघता आले नाही. ग्रहण बघण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. पण ढगांमुळे मला सूर्य दिसला नाही. पण सूर्यग्रहणाचे काही क्षण मी कोझीकोडमध्ये बघितले, तर काही प्रमाणात ग्रहण मी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून बघितले. तसेच तज्ञ्जांकडून या ग्रहणाबाबत अधिक माहितीही घेतली.'

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या ट्विटमध्ये मोदींनी ग्रहणाचा चष्मा लावून फोटो शेअर केला आहे. तर तज्ञ्जांशी चर्चा करतानाचे व लाईव्ह स्ट्रिमिंगचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.  

दोन लाखांवरील पीककर्ज माफीचा विचार - उद्धव ठाकरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi cant see Sun eclipse due to cloudy weather